आज राज्यात झालेल्या १३१ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ६३ हजार ४१६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ५२ हजार ८४४
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५२ हजार ८४४ वर आली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १३ हजार ५०३ वर गेला आहे. ठाणे जिल्ह्यात ७ हजार २८३ सक्रिय रुग्ण आहेत. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ५ हजार ५१५ इतकी आहे. तर, सांगलीत एकूण ४ हजार ७१२ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. अहमदनगरमध्ये एकूण ५ हजार १६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर सोलापुरात ४ हजार २२४ इतके रुग्ण आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईत उपचार घेत आहेत ३,३७८ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ३ हजार ३७८ वर आली आहे. तर, रत्नागिरीत १ हजार ०३९, सिंधुदुर्गात १ हजार ०३०, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार १५५ इतकी आहे.
नंदुरबारमध्ये आज दोन रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४७०, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७४ वर खाली आली आहे. अमरावतीत ही संख्या १०४ वर आली आहे. राज्यात नंदुरबारमध्ये सर्वात कमी रुग्णसंख्या असून येथे फक्त दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
२,९१,५२२ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३६ लाख ५९ हजार ६१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ५६ हजार ९३९ (१२.०३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९१ हजार ५२२ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ३१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times