मुंबई: राज्यात आज ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशा सक्रिय करोना बाधित रुग्णांची संख्या ५२ हजार ८४४ इतकी आहे. रुग्णवाढीमध्ये महाराष्ट्र गेल्या अनेक दिवसांपासून देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला करोना संसर्गाचा दर अधिक असलेल्या भागांमध्ये लागू करण्याची सूचना तीनच दिवसांपूर्वी केली होती. याबाबत राज्य सरकार विचार करत असून केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले आहे. (Health Minister has said that the state government is considering imposing a in the state)

राज्यावरील करोनाचे संकट अजून टळलेले नाही. केरळमध्ये ओणम या सणानंतर तेथील रुग्णांची संख्या वाढलेली दिसली आहे. आपल्यालाही आपल्या राज्यात अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आपल्या राज्यातही सणांचे दिवस येत असून त्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची अधिक आवश्यकता आहे. हे लक्षात घेत राज्य सरकार केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची नक्कीच काटेकोरपणे अंमलबजावणी करेल असे टोपे यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

अशी आहे राज्यातील करोना संसर्गाची स्थिती

महाराष्ट्रात आजच्या घडीला एकूण ५२ हजार ८४४ इतके सक्रिय रुग्ण आहेत. तर गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ६६६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३ हजार ५१० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, आज एकूण १३१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांची ही संख्या देशात केरळ नंतर दुसऱ्या क्रमांकाची आहे. यासाठी महाराष्ट्राने लसीकरण मोहिमेला वेग वाढवण्याची आवश्यकता असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. तसेच, त्यासाठी अधिक लसमात्रांची गरज असेल तर केंद्र सरकार लशीचा योग्य तो पुरवठा करेल असे केंद्रीय गृहसचिवांनी राज्य प्रशासनाला सांगितलेले आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारने या अनुषंगाने अनेक महत्वाच्या सूचना केलेल्या असून यात करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी टाळणे हे पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे केंद्राने सांगितले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
देशात ४१ जिल्हे असे आहेत ज्यांचा करोना संसर्ग दर १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तसेच करोनाची दुसरी लाट अजूनही गेलेली नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव हा करोनासंदर्भातील नियम पाळले जात नसल्यानेच वाढत असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटलेले आहे. केरळबरोबरच महाराष्ट्राने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची आवश्यकता असल्याचे केंद्राचे म्हणणे आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here