म. टा. प्रतिनिधी,

जिल्ह्यातील संपूर्ण दुष्काळी परिसराला देणं ही या सरकारची प्राथमिकता आहे. जत तालुक्यासाठी स्वतंत्र योजनेचे काम सुरू केले आहे. कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, आटपाडी या भागात ज्या गावांना आतापर्यंत पाणी पोहचू शकले नाही, तिथेही अतिरिक्त पाईपलाईन करण्यास प्राथमिकता दिली जात आहे. जिल्ह्यातील दुष्काळी भागात यापुढे पाण्यासाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, असा विश्वास यांनी व्यक्त केला. (there will be no more tears in eyes of anyone for water says water resources minister )

कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे ढालगाव वितरिकेच्या कामाची पाहणी व जलपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, गेले अनेक वर्षे जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. आता हा संघर्ष संपण्याच्या मार्गावर असून जिल्ह्यातील उर्वरित दुष्काळी भागालाही पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाण्यासाठी आता यापुढे कोणाच्याही डोळ्यात पाणी येणार नाही. कोणाला मोर्चाही काढावा लागणार नाही. जिल्ह्यातील पाणी योजना तातडीने पूर्ण करुन दुष्काळ संपविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत या भागात आता म्हैसाळ, टेंभू या उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून कृष्णेचे व वारणेचे पाणी पोहचत आहे. उपसा सिंचन योजना पुर्णत्वास नेणे व त्या सक्षमपणे चालविणे यासाठी प्रचंड निधीची आवश्यकता आहे. यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तरीही ज्या ज्या शेतक-यांच्या शेतात उपसा सिंचन योजनांचे पाणी आले आहे. त्या त्या शेतकऱ्यांनी वापरलेल्या पाण्याची पाणीपट्टी प्रामाणिकपणे भरुन पाणी योजना सक्षमीकरणासाठी आपला हातभार लावावा.

क्लिक करा आणि वाचा-
दुष्काळी पट्ट्यात आलेल्या पाण्यामुळे हरित क्रांतीचे स्वप्न साकार होत असले, तरीही पाण्याचा योग्य पध्दतीने वापर शेतीसाठी होणे आवश्यक आहे. पारंपरिक शेती न करता अधुनिक पध्दतीने शेती करुन पुढील काळात या भागाचा कायापालट होईल. त्याचबरोबर आर्थिकस्तरही सुधारेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

क्लिक करा आणि वाचा-
दुष्काळी भागातील जनतेने पाण्यासाठी अनेक मोर्चे काढले, अंदोलने केली. पण या पुढील काळात ती आवस्था निर्माण होणार नाही. दुष्काळी भागातील जनता चातकाप्रमाणे पाण्याची वाट पाहत होती. आता ही स्वप्ने पूर्णत्वास येत आहेत. उपसा सिंचन योजनेच्या कामांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली असून, टप्प्याटप्याने निधी प्राप्त होईल. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवून कामांसाठी निधी दिला जाईल. आरेवाडी येथील बिरोबा देवस्थान हे एक जागृत देवस्थान असून या ठिकाणी लाखो भक्त येतात. या बिरोबा देवस्थानाच्या विकासासाठी 4 कोटी 60 लाख रुपयांचा प्रस्तावित निधी तातडीने मिळवून देण्यासाठी राज्यस्तरावर मुंबई येथे बैठक आयोजित करुन हा निधी मिळवू, असे आश्वासनही पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमासाठी खासदार संजय पाटील म्हणाले, आमदार सुमनताई पाटील, आदी उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here