वाचा:
नीलम राणे यांनी राणे यांचे मुख्यमंत्र्यांबद्दलचे विधान, त्यानंतर त्याविरुद्ध शिवसेनेने केलेले आंदोलन, मग राणे यांना झालेली अटक या घटनाक्रमावर आपली मते स्पष्ट शब्दांत मांडली. ‘माझे पती नारायण राणे यांनी आपल्या आयुष्यातील ४० वर्षे या पक्षासाठी दिली. जो पक्षाचा नेता राहिलेला आहे त्याच्यासोबत शिवसेना असं वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. शिवसेना आज राणे यांच्याविरुद्ध जे काही करत आहे त्यावर काय बोलावं तेच समजत नाही’, असे नमूद करत ही कारवाई धक्कादायक अशीच होती, असे सांगण्याचा प्रयत्न नीलम राणे यांनी केला.
वाचा:
‘स्वातंत्र्यदिनाबाबत मुख्यमंत्र्यांचं जे अज्ञान होतं त्यावर राणे यांनी बोट ठेवलं होतं. त्यात काही गैर होतं असं मला वाटत नाही. त्यावर अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. आमच्या जुहू येथील घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही घरात नव्हतो आणि माझी नातवंडं, सुना घरात असताना हा प्रकार केला गेला. त्याचं मला वाईट वाटलं. घरावर चाल करून माणसे येतात तेव्हा त्यांना बेस उरलेला नाही असे वाटते. असं राजकारण याआधी कधीही झालं नाही. या थराला कुणी गेलं नाही’, असे सांगत नीलम राणे यांनी नाराजी व्यक्त केली. भाजप आमच्या पाठिशी आहे. त्यामुळे पुन्हा असं काही होईल असे वाटत नाही, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या. आणि नितेश राणे या दोन्ही मुलांना तुम्ही काय सल्ला देता असे विचारले असता, शांतपणे आपलं काम केलं पाहिजे असे मी त्यांना सांगत असते असे नीलम राणे म्हणाल्या. त्या एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times