जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. त्यांनी केलेल्या टीकेनंतर राज्यात वातावरण तापले होते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शिवसैनिकांनी नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या पार्श्वभूमीवर राणेंना अटक करण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्यानुसार राणेंवर कारवाई करण्यात आली होती.
वाचाः
नारायण राणेंवर कारवाई केल्यानंतर महाड न्याय दंडाधिकारी बाबासाहेब शेख यांच्या कोर्टासमोर झालेल्या सुनावणीत नारायण राणेंना जामीन मंजूर करण्यात आला होता. न्याय दंडाधिकाऱ्यांनी अटीशर्ती ठेवून जामीन मंजूर केला होता. त्यानुसार राणे आज अलिबाग पोलिसांसमोर हजेरी लावणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
नारायण राणे यांना कोर्टानं ३० तारखेला एनसीपीकडे हजेरी लावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज नारायण राणे अलिबाग पोलिस स्टेशनला एनसीपीकडे हजेरी लावण्याची शक्यता आहे. नारायण राणे अलिबागला येणार असल्यामुळं परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.
वाचाः
दरम्यान, कोर्टानं राणेंना महिन्यातून दोन वेळा पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times