बुधवारी गेट वे ऑफ इंडियावर होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सराव म्हणून या लढाऊ विमानांचं उड्डाण झालं होतं.
येत्या १ सप्टेंबर रोजी गेट वे ऑफ इंडियावर लष्कराचा एक कार्यक्रम होणार आहे. त्याचा सराव म्हणून मरीन ड्राइव्ह भागातून तीन उडाली. त्याचा आवाज इतका भयंकर होता की परिसरातील लोक काही काळासाठी घाबरले.
नक्की काय आहे कार्यक्रम?
१९७१ च्या युद्धविजयाची स्वर्णिम विजय ज्योत बुधवारी १ सप्टेंबरला मुंबईत येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ही ज्योत स्वीकारणार आहेत. त्यानिमित्ताने गेट वे ऑफ इंडियावर सायंकाळी ५.३० वाजता विशेष कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात हवाई दलाच्या हेलिकॉप्टरसह सुखोई विमानांचा फ्लाय पास्ट होणार आहे. त्याची रंगीत तालिम सोमवारी झाली. या कार्यक्रमात १९७१ च्या युद्धातील पाच वीरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन विशेष गौरव होणार आहे. हा गौरव सोहळा सुरू होण्याआधी सुखोई विमाने गेट वे ऑफ इंडियावरुन उडून सलामी देणार आहेत. त्याच्या रंगीत तालिमनिमित्त सोमवारी सायंकाळी ही तीन सुखोई विमाने पुण्याजवळील लोहगाव येथून उडून मुंबईत दाखल झाली. त्यावेळी जोरदार आवाजामुळे मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, सीएसटी, चर्चगेट परिसर हादरुन गेला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times