पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अतुल याचे वडील नरेंद्र (वय ७८) हे कृषी विभागाचे निवृत्त अधिकारी असून, ते पोलिसांविरुद्ध सुरू असलेल्या प्राथमिक चौकशीचे खटले चालवितात.अतुल हा खासगी कंपनीत काम करायचा. २०१८ मध्ये त्याची नोकरी सुटली. तेव्हापासून तो बेरोजगार आहे. अतुल याला दोन मुली आहेत. कौटुंबीक कलहामुळे त्याची पत्नी लहान मुलीला घेऊन माहेरी गेली.
क्लिक करा आणि वाचा-
यादरम्यान, अतुलला दारूचे व्यसन जडले. रविवारी रात्री अतुल हा दारू पिऊन घरी आला. मुलीसह तो खोलीत झोपायला गेला. याचदरम्यान चवीने आरडाओरड केली. नरेंद्र खोलीत गेले. चवी उलटी करीत होती. नरेंद्र यांनी तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारानंतर ती शुद्धीवर आली. वडिलाने गळा आवळ्याचे तिने नरेंद्र यांना सांगितले. नरेंद्र यांनी हुडकेश्वर पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांनी गुन्हा दाखल करून अतुल याला अटक केली.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times