पटोरकर कुटुंबातील काही सदस्य सिपना नदीवर मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी समोती पटोरकर या पाण्याच्या प्रवाहासोबत दूरपर्यंत वाहून गेल्या. त्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. कुटुंबियांकडून गावकऱ्यांच्या मदतीने समोती यांचा शोध घेण्यात आला. मात्र पाण्याच्या अथांग प्रवाहामुळे सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबवूनही समोती यांना शोधण्यात अपयश आलं. या दरम्यान कुटुंबियांकडून पोलीस पाटलांच्या मदतीने धारणीच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
धारणी पोलिसांकडून महिलेचा शोध घेणे सुरू असताना सोमवारी त्यांचा मृतदेह कारदा येथून वाहणाऱ्या सिपनेच्या पात्रात तेथील गावकऱ्यांना आढळला. ही माहिती स्थानिक पोलीस पाटलांकडून पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्यापर्यंत भ्रमणध्वनीमार्फत पुरवण्यात आली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योत्सना महाजन, पोलीस उपनिरीक्षक करूणा मोरे, बिट अमलदार रवि पाखरे, महेश कळे, गणेश घुले यांच्याकडून लगेच घटनास्थळी पोहोचून समोती यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. घटनेचा पंचनामा उरकून घटनास्थळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मृतदेहाची उत्तरीय तपाणी आटोपण्यात आली. पोलीस दप्तरी आकस्मिक मृत्यूची नोंद करून सदर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पटोरकर कुटुंबियांच्या स्वाधीन केला आहे. महिलेच्या मृत्यूने चिपोली गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times