जमिनीबाबतच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी लाच घेणाऱ्या कल्याणच्या तहसीलदारासह शिपायाला सोमवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( takes action against the tehsildar of )
तक्रारदाराच्या बांधकाम कंपनीने कल्याण तालुक्यातील वरप येथे जमीन घेतली असून या जमिनीबाबतच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी कल्याणचे तहसिलदार दिपक आकडे यांनी स्वत:साठी एक लाखांची लाच मागितली. तसेच लाचेची रक्कम कार्यालयातील शिपाई बाबू उर्फ मनोहर हरड यांच्याकडे देण्यास सांगितले. हरड यांनीही स्वत:साठी आणि कर्मचाऱ्यांसाठी २० हजारांची लाच मागितली होती. याबाबत २५ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने एसीबीकडे दिलेल्या तक्रारीनंतर लाचेबाबत एसीबीने पडताळणी केली.
क्लिक करा आणि वाचा-
लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सोमवारी कल्याण तहसिलदार कार्यालयात लावलेल्या सापळ्यात आकडे आणि हरड अडकले. तक्रारदार यांच्याकडून आकडे यांच्यासाठी एक लाख आणि हरड यांनी स्वत:साठी २० हजार असे एकूण १ लाख २० हजारांची लाच घेताना आकडे आणि हरड यांना रंगेहात पकडण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times