वाचा:
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८८ हजार ६४२ वर पोहचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार ६० झाली आहे. सध्या ४२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ७३ हजार २१५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ५ लाख ८२ हजार ७७७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५४० बाधितांचे मृत्यू झाले आहेत.
वाचा:
बुलडाण्यात रुग्णसंख्येत वाढ
विदर्भात सोमवारी दिवसभरात तपासण्यात आलेल्या अहवालांमध्ये ३१ नवे बाधित आढळले. यातील २० रुग्ण एकट्या जिल्ह्यात आढळल्याने चिंता वाढली आहे. जिल्हानिहाय रुग्णसंख्येत चार, गडचिरोली चार, अमरावती दोन तर वाशीममध्ये एक रुग्ण वाढला आहे. भंडारा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा शून्य रुग्णाची नोंद झाली. या वाढीव आकड्यांमुळे विदर्भातील एकूण रुग्णसंख्या ११ लाख १८ हजार १९१ वर पोहचली. यातील १० लाख ९८ हजार २४० बरे झाले तर २१ हजार २३७ दगावले आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times