शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा व रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांचा एक फोटो ट्वीट करत निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. निलेश राणेंच्या या ट्वीटची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
निलेश राणेंनी एक ट्वीट केलं आहे. तसंच, त्यांनी भास्कर जाधव यांच्या मुलाचे काही फोटोही ट्वीट केले आहेत. ट्वीटमध्ये ते म्हणतात. ‘शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा. रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विक्रांत जाधव मंदिर स्वतःसाठी उघडून बसलेत का? ठाकरे सरकारचे नियम आमदार खासदारांच्या मुलांना लागू होत नाहीत का? ठाकरे सरकारकडून प्रत्येक गोष्टीत उघड सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे, अशी बोचरी टीका निलेश राणेंनी केली आहे.
मंदिरांसाठी भाजपचे आंदोलन
राज्यात सुमारे दीड वर्षापासून मंदिरे बंद आहेत. गतवर्षी नोव्हेंबर महिन्याचा अपवाद वगळता इतरवेळी मात्र करोनाच्या लाटेचे कारण देत मंदिरे उघडण्यास सरकारने परवानगी दिलेली नाही. यावर राज्यात सर्वत्रच व्यवहार सुरळीत झाले असताना, केवळ मंदिरांचा अपवाद का ठेवला जातो, असा सवाल भाजपनं केला आहे. राज्यभरात आघाडीच्या वतीने शंखनाद आंदोलन करण्यात आले. राज्यातील काही शहरांमध्ये प्रमुख मंदिरांमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times