अकोला : अकोला जिल्हात पुढील वर्षी होऊ घातलेल्या महापालिका आणि नगर पालिका निवडणुका ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएम तूर्तास स्वबळावर लढणार असून, सर्वच धर्म, समाजातील उमेदवरांना संधी देण्यात येईल अशी माहिती जिल्हाध्यक्ष जमील खान यांनी पत्रकार परिषेदत दिली आहे.

काँग्रेसने मुस्लिमांकडे केवळ मतदार म्हणूनच पाहिले अशी टीका डॉ . खान यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका आणि नगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग, वॉर्ड रचनेचे प्रारूप कच्चा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. दरम्यान, आज एमआयएमने निवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

नेहमीच एमआयएमकडे एका विशिष्ट धर्मीयांचा पक्ष म्हणून पाहणे चुकीचे असून, मुळात ते सत्यच नाही. औरंगाबदसह अन्य ठिकाणी अन्य धर्मीय उमेदवार एमआयएकडून विजयी झाले आहेत. आता लवकरच संसदीय समिती गठीत करण्यात येत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एमआयएम पूर्ण शक्तीने लढणार आहे.

सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. तर निवडणुकीसाठी लवरकच पक्षाची संसदीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. यात बाळापूर व अकोट न.प.च्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याची माहिती आज हॉटेल जसनागरा येथील पत्रकार परिषद मध्ये दिली आहे. या पत्रकार परिषदेला एमआयएमचे पदाधिकारी उपस्तीत होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here