मुंबई: सगळे सण साजरे झाले पाहिजेत, तुम्हाला नियम लावायचे आहेत तर सगळ्यांसाठी सारखे लावा. कुठेच गर्दी कमी झाली नाही, मग सणांवरच का येता, असे सांगत मनसेचे अध्यक्ष यांनी साजरी करणार असा पवित्रा घेत सरकारवर टीकास्त्र सोडले. या टीकेला शिवसेनेचे नेते, खासदार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. करोनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने काही निर्बंध आणलेले आहेत, केंद्र सरकारनेही याबाबत सूचना जारी केल्या आहेत. पण तरीही काही राजकीय लोक हट्टाने दहीहंडी साजरी करताना दिसतात, असा टोला लगावत हे करोनाला आमंत्रण असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे. (shiv sena mp criticizes on his stand)

खासदार राऊत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. केरळमध्ये काय चालले आहे आपण पाहत आहोत. केरळमध्ये करोनाची तिसरी लाट सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी उघडल्या जात आहेत. पण काही राजकीय पक्ष ज्यांना जनतेमध्ये बेस नाही ते अशा प्रकारे वागत आहेत, असा टोला राऊत यांनी मनसेला लगावला.

क्लिक करा आणि वाचा-
ते पुढे म्हणाले, बरं हे बंधन कोणी घातले आहे?, हे बंधन केंद्र सरकारने आणले आहे. केंद्र सरकारने एक अॅडव्हायझरी जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की दहीहंडी आणि गणेशोत्सव याबाबत राज्याच्या सरकारने काळजी घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्राला तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र आहे. पण हे आमच्या लोकांना कळत नसेल तर आम्ही त्याला काय करणार?

क्लिक करा आणि वाचा-

‘आम्ही कारवाई केली तर म्हणतील हिंदुत्वविरोधी आहेत’
अशा लोकांवर केंद्र सरकार कारवाई करेल का? जर आम्ही कारवाई केली तर म्हणतील की आम्ही हिंदुत्ववादविरोधी आहोत. मात्र अॅडव्हायझरी केंद्र सरकारची आहे, गृहमंत्रालयाची आहे, अमित शहा यांची आहे. मग काय केंद्र सरकारला हिंदुत्ववादविरोधी म्हणणार का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here