खासदार राऊत हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. ईडीच्या कारवाईला राजकीय रंग असल्याचे सांगत ईडीवर भाजपचा दबाव असल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी केला. सोशल मीडियावर भाजपचे लोक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची यादी जाहीर करतात, असे सांगतानाच भारतीय जनता पक्षाचे समन्स ईडीकडे आहे की खरोखरच ते ईडीचे समन्स आहे याबाबत संभ्रम असल्याचे राऊत म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
राऊत म्हणाले की, भाजपच्या प्रमुख लोकांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या १० नेत्यांची एक यादी प्रसिद्ध केली आहे. या नेत्यांना क्रमाने बोलावले जाईल असे सांगण्यात येत आहे, असे सांगतानाच जसे मी काल बोललो की भारतीय जनता पक्षाचे लोक ईडीच्या कार्यालयात बसलेले आहेत की ईडीचे अधिकारी हे कार्यालयात बसले आहेत याचा शोध घेण्याची गरज आहे.
क्लिक करा आणि वाचा-
दहीहंडीवरून राज ठाकरेंवर टीका
राऊत यांनी मनसेच्या दहीहंडी साजरी करण्याच्या भूमिकेवरही निशाणा साधला. करोनाचे संकट असताना दहीहंडी साजरी करणे हे करोनाला आमंत्रण असल्याचे ते म्हणाले. केरळमध्ये काय चालले आहे आपण पाहत आहोत. केरळमध्ये करोनाची तिसरी लाट सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी उघडल्या जात आहेत. पण जनतेत आधार नसलेले राजकीय पक्ष कशा प्रकारे वागत आहेत, असे सांगतानाच हे बंधन केंद्र सरकारने आणले आहे. केंद्र सरकारने अॅडव्हाजरी जारी करत दहीहंडी आणि गणेशोत्सवाबाबत राज्याच्या सरकारने काळजी घेणे गरजेचे आहे, अशी सूचना केलेली आहे. महाराष्ट्राला तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र आहे. पण हे आमच्या लोकांना कळत नसेल तर आम्ही त्याला काय करणार?, असा टोलाही त्यांनी लगावला.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times