आज राज्यात झालेल्या १०४ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ७२ हजार ८०० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या किंचित घटली
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५१ हजार २३८ वर आली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १३ हजार ५१५ वर गेला आहे. ठाणे जिल्ह्यात ७ हजार ०८१ सक्रिय रुग्ण आहेत. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ५ हजार ६०२ इतकी आहे. अहमदनगरमध्ये एकूण ५ हजार ४४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, सांगलीत एकूण ४ हजार २६० इतके रुग्ण उपचार घेत आहेत. तर सोलापुरात ३ हजार ७३७ इतके रुग्ण आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईत उपचार घेत आहेत ३,४६९ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ३ हजार ४६९ वर आली आहे. तर, रत्नागिरीत १ हजार ०४५, सिंधुदुर्गात ९७७, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ६६९ इतकी आहे.
गोंदिया जिल्ह्यात फक्त दोन सक्रिय रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ५२४, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७० वर खाली आली आहे. अमरावतीत ही संख्या ९५ वर आली आहे. राज्यात नंदुरबारमध्ये तीन रुग्ण असून गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
२,९१,७०१ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३९ लाख ७६ हजार ८८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ६४ हजार ८७६ (११.९८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९१ हजार ७०१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार १२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times