याबरोबरच, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख २२ हजार ६२१ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ९७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०५ टक्के इतका आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता १ हजार ५११ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईत आज ३० हजार ४२१ चाचण्या
मुंबईत आज एकूण ३० हजार ४२१ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये एकही सक्रिय कंटेनमेंट झोन नसून एकूण २९ इमारती सील करण्यात आल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती
२४ तासांत बाधित रुग्ण – ३२३
२४ तासात बरे झालेले रुग्ण – २७२
बरे झालेले एकूण रुग्ण – ७२२६२१
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%
एकूण सक्रिय रुग्ण- ३१०६
रुग्ण दुपटीचा कालावधी- १५११ दिवस
कोविड वाढीचा दर (२४ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट)- ०.०५ %
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times