: नात्‍याला काळीमा फासणारी एक घटना औरंगाबाद शहरात उघड झाली आहे. सख्‍ख्‍या भावानेच आपल्या लहान बहिणीला जीवे मारण्‍याची धमकी देत बलात्‍कार केला. विशेष म्हणजे या अत्‍याचारातून पीडितेने एका मुलालाही जन्म दिला आहे. या प्रकरणात नराधम भावाला सिटीचौक पोलिसांनी अटक केली असून त्‍याला ३ सप्‍टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए.एस. खडसे यांनी सोमवारी (३० ऑगस्ट) दिले.

या प्रकरणात १५ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली. त्‍यानुसार, ३३ वर्षीय आरोपी हा सेक्युरिटीचे काम करत होता. त्‍याची पीडितेवर बऱ्याच दिवसांपासून वाईट नजर होती. सन २०२० मध्‍ये आरोपी हा पीडितेला वाईट उद्देशाने स्पर्श करत होता, मात्र पीडितेने भीतीपोटी ही बाब कोणाला सांगितली नाही. जानेवारी २०२१ मध्‍ये दुपारी आरोपी हा कामावरुन घरी आला, घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीने पीडितेला जीवे मारण्‍याची धमकी देत बळजबरी तिच्‍यावर बलात्‍कार केला. त्‍यानंतर आरोपीने घरी कोणी नसताना वांरवार पीडितेवर बलात्‍कार केला.

जुलै २०२१ मध्‍ये पीडितेचे पोट दुखत असल्याने पीडितेच्‍या आईने तिला दवाखान्यात नेले. तेव्‍हा पीडिता ही गर्भवती असल्याचं समोर आलं. मात्र आरोपीने पीडितेला धमकी देत मुंबईच्‍या एका मुलासोबत तुझे संबंध होते, त्‍यातूनच गर्भवती झाल्याचे सांग असं म्हणाला आणि होणाऱ्या मुलाचा सांभाळ करू, असं आरोपीने पीडितेला सांगितलं. आई-वडिलांकडून सततच्‍या होणाऱ्या विचारणेमुळे पीडितेने आत्‍महत्‍येचा विचार केला होता. मात्र आई-वडिलांनी मुलाचा सांभाळ करू, असं म्हणत पीडितेला समजावून सांगितलं.

दरम्यान, २५ ऑगस्‍ट रोजी पीडितेने शहरातील खासगी रुग्णालयात बाळाला जन्‍म दिला. पीडितेवर उपचार सुरू असताना पीडितेने दिलेल्या जबाबावरुन आरोपी भावाविरोधात सिटीचौक पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. आरोपीला न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची आहे, गुन्‍ह्यात आरोपीला कोणी मदत केली काय याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती अतिरिक्त लोकाभियोक्ता सतिष मुंडवाडकर यांनी न्‍यायालयाकडे केली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here