लेहः सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या लडाखमध्ये भारताने जगातील सर्वात उंच रस्ता बांधला आहे. १८,६०० फूट उंचीवर बांधलेला हा रस्ता, लेह (जिगराल-तांगत्से) पासून केला पास ओलांडून पँगाँग सरोवरपर्यंत ४१ किमीचे अंतर कमी करेल. हा रस्ता लष्कराच्या ५८ अभियंता रेजिमेंटने बांधला आहे. हा रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. ३० किलोमीटरचा हा रस्ता आहे. या रस्त्यामुळे लेहवरून चीन सीमेवर पँगाँग सरोवराच्या ठिकाणी पोहोचणं सुलभ होणार आहे.

लडाखमधील भाजप खासदार जम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी मंगळवारी या रस्त्याचे उद्घाटन केले. हा रस्ता सामरिक तसंच पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. वाहन चालवण्यायोग्य असलेला १८,६०० फूट उंचीवर बांधलेला हा आहे, असं नामग्याल म्हणाले. खार्दुंगला पास १८, ३८० फूट उंचीवर आहे. त्याही अधिक उंचीवर हा रस्ता आहे.

पर्यटनासाठी उत्तम ठिकाण

हा रस्ता भविष्यात स्थानिक नागरिकांसाठी खासकरून लडाखमधील लालोक भागातील नागरिकांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी मोठी भूमिका बजावेल. कारण या रस्त्यामुळे पर्यटनाचा मार्ग मोकळा होणार आहे. पर्यटकांना जगातील सर्वांत उंचीवर वाहन चालवण्यायोग्य रत्ता आणि दुर्मिळ औषधी वनस्पती, स्नो स्पोर्ट, वन्य प्राणी, सरोवर आणि इतर आकर्षक ठिकाणांना बघता येईल, असं नामग्याल यांनी सांगितलं.

भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल पी. जी. के. मेनन, जनरल ऑफिसर कमांडिंग १४वी कॉर्प्स यांच्यासह लडाखमधी स्थानिक नेते उपस्थित होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here