संगमनेर: जमाव नियंत्रणाच्या सरावासाठी संगमनेरमध्ये पोलिसांकडून सुरू असताना एक महाविद्यालयीन युवक जखमी झाला. सरावासाठी पोलिसांनी फेकलेले अश्रुधुराचे नळकांडे बस स्टँडवरील युवकाच्या पायाजवळ फुटून तो जखमी झाला. सराव पथकात रुग्णवाहिका नसल्याने पोलिस वाहनातूनच त्याला रुग्णालयात हलविण्यात आले.

संगमनेर बसस्थानकावर पोलिसांनी हा सराव केला. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला मात्र मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक सुरू असताना पोलिसांनी फोडलेली अश्रुधुराची एक नळकांडी बस स्थानकावर गावाकडे परतण्यासाठी एसटी बसची वाट पाहत असलेल्या एका महाविद्यालयीन तरुणाच्या दोन्ही पायाच्यामध्ये फुटली. यामुळे तरुणाच्या दोन्ही पायांना मोठी दुखापत झाली. यावेळी घटनास्थळी रुग्णवाहिका नसल्याने जखमी झालेल्या महाविद्यालयीन तरुणाला रुग्णालयात नेण्यासाठी पोलिसांना पोलीस जीपचा वापर करावा लागला. घटना घडल्याची माहिती मिळताच काही नागरिक मदतीसाठी धावले तर काही जण तेथून पळून गेले. यामुळे बसस्थानकावर मोठा गोंधळ उडाला. पोलिसांची ही एक कवायत असल्याचे समजताच प्रवाशांनी यंत्रणेला शिव्यांची लाखोली वाहिली. महिला, लहान मुले यांची विशेष गर्दी आज बस स्थानकावर होती. पोलीस प्रशासनाचा गलथान कारभार यामुळे जनतेने अनुभवला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here