म. टा. प्रतिनिधी,

करोनाचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासनाने दहिहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी दिलेली नाही. करोना अटोक्यात येत असतांना देखील दहीहंडी उत्सवावर घालण्यात आलेल्या बंदीचा निषेध करीत आज मंगळवारी मनसेने सर्व निर्बंध झुगारून लावत शहरातील शिवतिर्थ मैदान परिसराजवळ दहीहंडी फोडली आहे. तसेच राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करत, हिंदू सणांवर घालण्यात आलेल्या बंदीचा निषेध केला आहे. यावेळी राज्य सरकाराचा ‘’ म्हणून घोषणा देत निषेध करण्यात आला. (calling as a mns workers celebrate dahi handi in jalgaon)

महाराष्ट्रात करोनाचे संकट अटोक्यात येत असतांना देखील महाराष्ट्रातील आघाडी सरकार हिंदू सणांना परवानगी देत नाही व इतर पक्षांच्या हजारोंच्यावर कार्यकर्ते रस्त्यांवर आंदोलन करतात परंतु हिंदूचा सण असलेला दहिहंडी साजरी करण्यासाठी परवानगी देत नसल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यातील व्यक्त केला. तसेच ठाकरे सरकारची तुलना ‘कंस मामा’ शी करून, राज्यात ठाकरे सरकार मथुरेतील ‘कंसा’ च्या शासनाप्रमाणे वागत असल्याचे आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

क्लिक करा आणि वाचा-
जळगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम, तालुकाध्यक्ष मुकूंद रोटे यांच्या नेतृत्वात खाली सरकारच्या निषेधाची दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी संदीप महाले, योगेश पाटील, पंकज चौधरी, तुषार पाठक, राहूल माळी, कुणाल पाटील, कुणाल पवार, धनंजय चौधरी, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. स्मित चौधरी, हर्षल निकम, तेजस रोटे या लहान बाळकृष्णांनी दहिहंडी फोडली.

क्लिक करा आणि वाचा-

पोलिसांनी बजावल्या नोटीसा
दहिहंडी उत्सव साजरा करण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही परवानगी नाही. मात्र, तरीही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाची परवानगी न घेताच उत्सव साजरा केल्यामुळे संबधित पदाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here