वाचा:
चेंबूरच्या मारोली चर्च येथील परिसरात देवांश आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. सोमवारी दुपारी देवांशची आई ही किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर पडली. यावेळी घरामध्ये देवांशसोबत उर्मिला यांचे सासरे आणि भाची होती. घरी परतल्यानंतर उर्मिला यांनी देवांशबद्दल विचारले असताना भाचीने तो वरच्या खोलीत झोपला असल्याचे सांगितले. उर्मिला यांनी खोलीत जाऊन पाहिले असता देवांश बेडवर दिसला नाही. आजूबाजूला कुठेच तो दिसत नसल्याने त्या बाथरूममध्ये गेल्या. बाथरूममधील पाण्याने भरलेल्या बादलीत देवांश डोक खाली आणि पाय वर अशा अवस्थेत आढळला. बेशुद्धावस्थेत असलेल्या देवांशला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
वाचा:
देवांश याच्या नाकामध्ये आणि तोंडामध्ये पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. कुटुंबियांचा देखील कुणावर संशय नाही. याप्रकरणात अपमृत्यूची नोंद करण्यात आल्याचे चेंबूर पोलिसांनी सांगितले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times