रत्नागिरी जिल्हाधिकारी सभागृहात झालेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आलेत. अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ जिल्हास्तरीय समिती, दूध भेसळीला आळा घालण्यासाठीची जिल्हास्तरीय समिती व केंद्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ च्या कलम ५ अंतर्गत बजावणीचा आढावा घेण्यासाठी नियंत्रण कक्ष समिती आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी हे आदेश दिले आहेत.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, उपजिल्हाधिकारी राजश्री मोरे, सहाय्यक आयुक्त (अन्न ) सं.भा. नारागुडे, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, अन्न सुरक्षा अधिकारी विजय पाचुपते, पाटणकर आदी उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त नारागुडे यांनी यावेळी कार्यालयाकडून राबविण्यात आलेल्या तपासणीसत्र तसेच आदी कार्यवाही बाबतची माहिती दिली.
जिल्हाधिकारी म्हणाले शाळांमध्ये ईट-टाईड फुड कँम्पियन राबवा, तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास प्रतिबंधित असलेल्या ठिकाणी ड्राइव्ह घ्या, भेसळ टाळण्यासाठी हॉटेल्स आदी ठिकाणी स्पॉट तपासणी करा आदी सूचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दिल्या आहेत.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times