या घटनेमुळे संपूर्ण राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्भवती महिलेची सोनोग्राफी करायची या कारणाने महिला हॉस्पिटलमध्ये गेली असता सोनोग्राफी सेंटरमध्ये अश्लील चाळे करत जातीवाचक बोलून विनयभंग केल्याचा गुन्हा हजारे यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. रूपसिंह हजारी एक स्त्रीरोगतज्ञ असून ते धारूरचे विद्यमान नगराध्यक्ष देखील आहेत. पण त्यांच्याकडून महिलेशी अश्लील वर्तन केल्यामुळे राजकीय आणि आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
काल दुपारी एक १९ वर्षीय गर्भवती तपासणीकरिता गेली असता तिला सोनोग्राफी करायची होती. म्हणून तिला सोनोग्राफी सेंटरमध्ये नेत अश्लील चाळे करण्यात आले. इतकंच नाही तर जातीवाचक टीकाही केली. यावर सध्या पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपासणी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times