आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पालकमंत्री यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली होती. छगन भुजबळांच्या मालमत्तेची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आघाडी सरकारविरोधात जोरदार टीका केली आहे. तर, जितेंद्र आव्हाड यांच्यावरही निशाणा साधला आहे.
वाचाः
ईडीच्या लिस्टमधील १२ वा खेळाडू कोण?, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता किरीट सोमय्यांनी १२ वा खेळाडू जितेंद्र आव्हाड आहेत, असं म्हटलं आहे. तसंच, आघाडीतील इतर ११ नेत्यांबाबत चौकशी सुरू झाली आहे. पुरावे कारवाई पुढे नेणे ही प्रक्रिया सुरू आहे. तर, अनिल परब व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबाबत कारवाई सुरू झाली आहे, अशी माहितीही किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
वाचाः
छगन भुजबळ यांनी संपत्ती जाहीर करावी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नामी, बेनामी संपत्ती जाहीर करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. आर्मस्ट्राँग एनर्जी, आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर, या कंपनीमध्ये पैसे कुठून आला. यातून जी प्रॉपर्टी आली ती कुठून आली, असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times