नवी दिल्लीः ईशान्य दिल्लीतील हिंसाचारावरून अभिनेते रजनीकांत यांनी केंद्र सरकारवर म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. दिल्लीतील हिंसाचार गुप्तचर विभाग अर्थात गृहमंत्रालयाचे अपयश आहे, अशी गंभीर टीका रजनीकांत यांनी केलीय. यासोबत रजनीकांत यांनी दिल्लीकर नागरिकांनाही संयमाचे आवाहन केले आहे.

दिल्लीत सीएएवरून तीन दिवस हिंसाचार सुरू होता. या हिंसारातील मृतांचा आकडा २० हून अधिक झालाय. तर २०० हून अधिक जण जखमी आहेत. या हिंसाचारावर अभिनेते रजनीकांत वक्तव्य केलंय. ‘दिल्ली हिंसाचार हा गुप्तचर विभाग अर्थात केंद्रीय गृहमंत्रालयाचे अपयश आहे. एखाद्या गोष्टीचा निषेध हा शांततेतही करता येतो. त्यासाठी हिंसा करण्याची गरज नाही. आणि तरीही हिंसाचार झाल्यास तो कठोरपणे निपटून काढला पाहिजे’, असं अभिनेते रजनीकांत म्हणाले.

दिल्लीतील हिंसाचारावर याआधी लेखक चेतन भगत यांनीही केंद्र सरकावर टीका केलीय. त्यांनी ट्विटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकेचं लक्ष्य केलं. मोदी पाहुण्यांसोबत आहेत आणि दुसरीकडे हिंसाचार सुरू आहे, अशा आशयाचं ट्विट भगत यांनी केलं होतं.

लेखक, कलाकारांकडून दिल्लीतील हिंसाचारावर केंद्र सरकारवर टीका वाढत चालली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here