मुंबईः बहिणीनं आपल्या सख्ख्या भावावर बलात्काराचा खोटा आरोप केल्याची घटना घडली आहे. कोर्टानं दोन वर्षाच्या कालावधीनंतर या तरुणाची निर्दोष सुटका केली आहे. धक्कादायक म्हणजे, प्रियकराच्या सांगण्यावरुन तरुणीने भावाच्या अटकेचा कट रचल्याची कबुली तिने दिली आहे.

दोन वर्षांपूर्वी एका अल्पवयीन तरुणीनं सख्ख्या भावावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला होता. तिच्या आरोपाची दखल घेऊन पोलिसांनी तरुणाला पॉक्सो अंतर्गंत अटक केली होती. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू होती. सुनावणीदरम्यान या तरुणीनं भावावर खोटा आरोप केल्याची कबुली दिली आहे. तरुणीच्या कबुलीनंतर तरुणाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

वाचाः
अल्पवयीन मुलीचे एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. ही बाब मुलीच्या भावाला समजली. त्याचा या प्रेम प्रकरणाला विरोध होता. अनेक वेळा भावाने सांगूनही ती ऐकत नव्हती. भावाच्या रोजच्या ओरडण्यामुळं ती वैतागली होती. शेवटी तिनं प्रियकराच्या सांगण्यावरुन भावाविरोधात खोटी तक्रार दाखल केली.

२०१७ साली केला होता आरोप

अल्पवयीने तरुणीनं या आधी २०१७मध्ये पहिल्यांदा बलात्कार झाल्याचं कोर्टात सांगितलं होतं. त्यावेळी तरुणीची आई नाइट शिफ्टला होती व वडिल बाहेर कामासाठी गेले होते. त्यानंतर २०१८ मध्ये पुन्हा एकदा तरुणीवर बलात्कार झाला, यावेळी या घटनांची माहिती मी आई- वडिलांना दिली होती, असं या तरुणींनी पोलिसांना व कोर्टात सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत कारवाई करत मुलीच्या भावाला अटक केली होती.

वाचाः
मुलीचा भाऊ दोन वर्ष तुरुंगात होता. अखेर मुलीने कोर्टात हा आरोप खोटा असल्याचं कबूल केलं. तसंच, भाऊ आपल्याला वाचवत होता, असंही कोर्टाला सांगितलं. त्यानंतर कोर्टानं ही खटलाच चुकीचा असल्याचं सांगितलं व तरुणाची निर्दोष मुक्तता केली आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here