मुंबई: संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोविड महामारीची तिसरी लाट कधीही धडकू शकते. ही लाट येऊच नये किंवा तिची तीव्रता कमीत कमी असावी यासाठी राज्य सरकार अनेकविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील कोविड कृती दलाने () रविवार, ५ सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ही ऑनलाइन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे.

वाचा:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी होणार असून त्यांच्या भाषणानं परिषदेचं उद्घाटन होणार आहे. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत. रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणारी परिषद समाज माध्यमांवरून प्रसारित केली जाणार आहे. राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टर्स, वैद्यकीय तज्ञ तसेच नागरिकांनाही परिषदेस ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे.

वाचा:

या परिषदेतील चर्चेमुळे कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मनात असलेल्या शंका, सुरक्षेच्या दृष्टीनं घ्यावयाची काळजी अशा विविध बाबींची माहिती घेता येणार आहे. या परिषदेसाठी
यावर प्रश्न पाठवता येतील.

या परिषदेत कोविड राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ राहुल पंडित, डॉ. शशांक जोशी, डॉ. अजित देसाई यांच्यासह मुलांसाठीच्या राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, तसेच अमेरिकेतील डॉ. मेहुल मेहता सहभागी होणार आहेत. परिषदेत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित राहणार आहेत.

ही परिषद cmomaharashtra यांच्या ट्विटर, फेसबुक व युट्युब
वरून देखील पाहता येईल.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here