मुंबई : यांनी यांची राजभवन येथे भेट घेतली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री हे देखील मुख्यमंत्र्यासह उपस्थित होते.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. राज्य सरकारच्या शिफारशीनंतरही राज्यपालांकडून या नावांवर शिक्कामोर्तब होत नसल्याने महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर न्यायालयात हा प्रश्न गेल्यानंतर न्यायालयानेही याबाबत टिपण्णी केली . या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतल्याची माहिती आहे.

गेल्या ८ महिन्यांपासून या १२ आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. याबाबत पुणे दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे या मुद्द्याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटीसाठी बोलावले होते. त्यानुसार ही भेट ठरली होती.

दरम्यान, या भेटीनंतर राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत हालचाली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here