राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी राज्यपालांना आमदारांच्या नियुक्तीलर लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केल्याचे पवार यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
‘कोणाचेही नाव गाळण्याबाबच चर्चा नाही’
१२ आमदारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि स्वाभीमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांची नावे वगळण्यात येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. एकनाथ खडसे यांची ईडी चौकशी करत असून शेट्टी यांच्याविरोधातही एका प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळे राज्यपालांचा या दोन नावांवर आक्षेप आहे अशी चर्चा ऐकायला मिळत होती. मात्र, अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आम्ही राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा केली असून आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा केवळ लवकर निर्णय घ्यावा या अंगानेच चर्चिला गेला असे पवार म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील राज्यपालांना आमदार नियुक्तीबाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती केल्याचे सांगितले. १२ आमदारांच्या यादीतील कोणाची नावे वगळण्याबाबत कसलीही चर्चा झाली नाही, किंवा राज्यपालांनीही कोणत्याही नावावर आक्षेप घेतलेला नसल्याचे थोरात म्हणाले.
राज्यपालांच्या आजच्या भेटीत राज्यातील करोनाची स्थिती, तसेच पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत राज्यपालांना माहिती दिली असे अजित पवार यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times