मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज (Coronavirus) बाधितांच्या मृत्यूंच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. तर, दैनंदिन मृत्यू वाढले आहेत. मात्र कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या थोडी घटल्याने हा दिलासाही मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ४ हजार ४५६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ४ हजार १९६ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ४ हजार ४३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ४ हजार ६८८ इतकी होती. तर, आज १८३ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या १०४ इतकी होती. (maharashtra registered 4456 new cases in a day with 4430 patients recovered and 183 deaths today)

आज राज्यात झालेल्या १८३ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ७७ हजार २३० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ टक्के इतके झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या किंचित घटली

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५१ हजार ०७८ वर आली आहे. काल ही संख्या ५१ हजार २३८ वर होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा वाढून तो १४ हजार ०९१ वर गेला आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या कमी होत ती ६ हजार ९११ वर आली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ५ हजार ९७९ इतकी आहे. अहमदनगरमध्ये एकूण ५ हजार ६५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, सांगलीत एकूण ३ हजार ५६२ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. तर सोलापुरात ३ हजार १५२ इतके रुग्ण आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

मुंबईत उपचार घेत आहेत ३,६०२ रुग्ण

मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ३ हजार ६०२ वर आली आहे. तर, रत्नागिरीत १ हजार ०८७, सिंधुदुर्गात ९९१, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ६३९ इतकी आहे.

नंदूरबार जिल्ह्यात फक्त दोन सक्रिय रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ५५०, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७६ वर खाली आली आहे. अमरावतीत ही संख्या ९७ वर आली आहे. राज्यात नंदुरबारमध्ये दोन रुग्ण असून हीच राज्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

क्लिक करा आणि वाचा-

२,९०,४२७ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४१ लाख ५४ हजार ८९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ६९ हजार ३३२ (११.९५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९० हजार ४२७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ०७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here