‘सध्या तरी संचारबंदी,जमावबंदीची गरज नाही’
करोना नियंत्रणात येत नसल्यास महाराष्ट्राच नाईट कर्फ्यूच्या पर्यायाचा विचार करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने देखील राज्यातील ज्या भागांमध्ये करोनाच्या रुग्णवाढीचा दर अधिक आहे अशा भागांमध्ये नाईट कर्फ्यू लावता येतो का, याबाबत विचार सुरू केला होता. मात्र सध्या तरी नाईट कर्फ्यु, संचारबंदी किंवा जमावबंदीची गरज नसल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले. टास्क फोर्सने सांगितल्यानुसार सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत करोनाची रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. जर या अंदाजानुसार रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध कडक करण्याची गरज आहे, असेही शेख म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसल्यास करोनाचे निर्बंध कडक करण्यात येतील. मात्र राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीचे पालन योग्य प्रकारे केले गेले तर पुढे निर्बंध लावण्याची गरज भासणार नाही. मात्र, सध्या ठिकठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे. परदेशात अमेरिका, युरोपसारख्या देशांमध्ये करोना प्रतिबंधक लशीच्या दोन डोसनंतरही रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज असल्याचे मत अस्लम शेख यांनी व्यक्त केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
राज ठाकरेंना लगावला टोला
सण कोणत्या धर्माचा आहे हे पाहून करोना विषाणूची लागण होत नाही. मग सण हिंदुंचे असोत की इतर कोणत्याही धर्माचे, असे सांगतानाच लोकांच्या जीवाशी खेळून सण साजरे करणे कितपत योग्य आहे, असा सवाल शेख यांनी उपस्थित केला आहे. लोकांच्या जीवशी खेळून सण साजरे करण्याचा आग्रह धरणे कितपत योग्य हे त्यांनीच ठरवावे, असे म्हणत शेख यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. मंदिरांबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येणार असून करोनाची स्थिती नियंत्रणात आली की सर्वधर्मीयांसाठी निर्णय घेतला जाईल असेही ते पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times