श्रीनगरः काश्मीरमधील फुटिरतावादी हुर्रियत नेते यांचे निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. श्रीनगरमध्ये बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनानंतर काश्मीर खोऱ्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी इंटरने सेवा बंद करण्यात आल्याची ही माहिती दिली.

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. गिलानी यांच्या निधानाचे वृत्त ऐकून दुःख झालं आहे. आम्ही बहुतांश गोष्टींवर सहमत असू शकत नाही, परंतु त्यांचा दृढनिश्चय आणि विश्वासाने उभे राहिल्याबद्दल त्यांचा आदर करते. अल्लाहने त्यांना जन्नत द्यावी आणि त्याच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी, असं मुफ्ती म्हणाल्या.

सय्यद अली शाह गिलानी यांचा जन्मम २९ सप्टेंबर १९२९ मध्ये बारामुला जिल्ह्यात झाला. गिलानी आधी जमात ए इस्लामी काश्मीरचे सदस्य होते. पण नंतर त्यांनी तहरीक ए हुर्रियत नावाचा आपला पक्ष स्थापन केला. गिलानी हे तीनवेळा सोपोर मतदारसंघातून आमदार झाले होते.

पाकिस्तानने गिलानी यांचा सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मान केला होता. फुटिरतावादी नेते सय्यद गिलानी हे भारतविरोधी वक्तव्यामुळे कायम वादात असायचे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here