वाचा:
पाठीत खंजीर खुपसण्याची चर्चा निघाली की पूर्वी एकाच नेत्याचे नाव डोळ्यांसमोर यायचे. आता ही चर्चा सुरू झाली की आणखी एक चेहरा नजरेसमोर येतो, असं म्हणत, पाटील यांनी काल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. पाटील यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना उत्तर दिलं. ‘चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांकडं दुर्लक्ष करायला हवं. महाराष्ट्राच्या पुढं खूप मोठे विषय आणि कामं आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला पुढं घेऊन चालले आहेत. देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव आलं आहे. त्यामुळं विरोधी पक्षाचं दु:ख समजण्यासारखं आहे. त्यांच्या टीकेकडं दुर्लक्षच केलेलं बरं,’ असं राऊत म्हणाले.
वाचा:
‘शिवसेनेचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. खंजीर खुपसण्याची कामं शिवसेनेनं कधीच केली नाहीत. बाळासाहेब ठाकरेंपासून ते आता उद्धव ठाकरेंपर्यंत कुणीही असं काही केलेलं नाही. ‘बंद दाराआड नेमकं काय ठरलं होतं आणि तिथून शब्द कसे फिरवले गेले हे आता लपून राहिलेलं नाही. त्याला प्रकाराला काय म्हणायचं? आता आम्हाला त्यात पडायचं नाही. महाराष्ट्रातील सध्याचं वातावरण वेगळं आहे. राज्यातील जनतेला मदतीची गरज आहे,’ असं सांगत राऊत यांनी या विषयावर अधिक बोलणं टाळलं.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times