वन विभागाला वन्यप्राण्यांच्या तस्करीबाबत माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे रत्नागिरीचा वनविभाग आणि पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने हा सापळा रचला. या सापळ्यात ३ तस्कर आरोपी सापडले. महेश महिपत पवार (रा. आगरवायंगणी, ता. दापोली वय ४३ वर्षे), संदेश शशिकांत पवार (रा. आगरवायंगनी ता. दापोली वय ३६ वर्षे), मिलींद जाधव (रा. धोपावे ता. गुहागर वय ४२ वर्षे) अशी या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून जिवंत खवलेमांजर () ( ) हा प्राणी ताब्यात घेण्यात आला. तसेच महिंद्रा कंपनीची लोगन चार चाकी वाहन देखील जप्त करण्यात आले आहे. या सर्व आरोपीच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी अशाच एका गुन्ह्यात खेड रेल्वे स्टेशनजवळ दापोली वनविभागाने मोठी कारवाई करून ५ ते ६ जणांना अटक केली होती.
क्लिक करा आणि वाचा-
मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापूर डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख व पोलिस निरिक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
क्लिक करा आणि वाचा-
या तस्करांवर कारवाई करणाऱ्या या पथकात सह परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, वनरक्षक सागर गोसावी, वनरक्षक संजय रणधीर, वनरक्षक राहुल गुंठे, तसेच पोलीस हवालदार प्रशांत बोरकर, पोलीस हवालदार शांताराम झोरे, पोलीस हवालदार बाळू पालकर, हवालदार व्हाईड लाईफ क्राइम कंट्रोल ब्यूरो विजय नांदेकर यांचा समावेश आहे. या प्रकरणातील पुढील तपास चिपळून वनपरिक्षेत्र अधिकारी करत आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times