लखनऊः दिल्लीतील हिंसाचारावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसिम रिझवी यांनी एक वक्तव्य केलंय. ईशान्य दिल्लीत उफाळून आलेल्या हिंसाचाराला एमआयएमचे नेते वारिस पठाण कारणीभूत आहेत, असा आरोप वसिम रिझवी यांनी केला. ‘१०० कोटी हिंदूंवर १५ कोटी मुस्लिम भारी’ असं वादग्रस्त वारिस पठाण यांनी केलं. यामुळे हिंसाचार उफाळून आला. एवढचं नव्हे तर रिझवी यांनी शाहीनबागमधील सीएएविरोधातील धरणे आंदोलन करणाऱ्या महिलांवरही टीका केली. शाहीनबागमध्ये धरणे आंदोलन करणाऱ्या महिलांचा अडाणीपणाचा परिणाम हिंसेत झालाय, असं रिझवी म्हणाले.

‘हा जोडून सर्वांना विनंती आहे. काँग्रेसच्या विषाचा प्याला पिऊ नये. काँग्रेसच्या जाळ्यात अडकून सरकारविरोधी वातावरण बनवू नका. सरकार, देश आणि सीएए कायदा आपलाच आहे. आपसात लढून मरणारे शहीद म्हणवले जात नाहीत. दिल्लीतील हिंसेला वारिस पठाण कारणीभूत आहे’, असं वसिम रिझवी म्हणाले.

‘शाहीनबाग आंदोलन हिंदूंचा अधिकार हिसकावण्याचा हट्ट’

वसिम रिझवी हे आपल्या वक्तव्यांनी कायम चर्चेत असतात. सीएएविरोधी होणाऱ्या आंदोलनांवरही त्यांनी सडकून टीका केलीय. त्यांनी अलिकडेच एक वक्तव्य केलं होतं. अशीच परिस्थिती राहिली तर इस्लामिक दाढी आणि विना मिशीवाल्या भितीदायक चेहऱ्यांमुळे हिंदुस्थानमधील गंगा-यमुनेची संस्कृती लयास जाईल. शाहीनबाग सारखे हजारो धरणे आंदोलनं होऊ देत. पण नागरिकत्व दुरुस्ती कायदा मागे घेऊ नये. शाहीनबागचे आंदोलन हे अधिकार मागण्याचे आंदोलन नाही तर हिंदूंचा हक्क हिसकावण्याचा हट्ट आहे. पाकिस्तान आधी कसाबला पाठवत होता. पण आता ओवेसी सारख्या व्हायरसमुळे हिंदूस्थानमध्ये कसाब तयार केले जात आहेत, असं वसिम रिझवी म्हणाले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here