पीडित विद्यार्थिनी बारावीत असून तिची लहान बहीण दहावीत आहे. तिचे वडील आजारी असून आई श्रमिक आहे. मंगेश हा विद्यार्थिनीच्या ओळखीचा आहे. ११ मार्च २०२० ला मंगेश हा विद्यार्थिनीच्या घरी आला. यावेळी घरी कोणी नव्हते. त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यांनतर तो विद्यार्थिनीवर सतत अत्याचार करायला लागला. काही दिवसांपूर्वी मंगेश हा तिच्या घरी आला. तिला घेऊन तो वाकी येथील एका फार्महाऊसवर घेऊन गेला. याचदरम्यान आकाश व ठाकूरही तेथे आले. तिघांनी दारू प्यायली. तिघांनी विद्यार्थिनीला बळजबरीने दारू पाजली. तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
क्लिक करा आणि वाचा-
अत्याचाराचे केले चित्रिकरण
मंगेशने अत्याचाराचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर हे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देऊन तिघेही तिचे शारीरिक शोषण करायला लागले. तिघांचा छळ असह्य झाल्याने तिने वडिलांना याबाबत सांगितले. वडिलाने एका महिला सामाजिक कार्यकर्त्याला मदतीची विनंती केली. सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पीडित विद्यार्थिनीने मानकापूर पोलिसांत तक्रार केली.
क्लिक करा आणि वाचा-
पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. मानकापूर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तिघांना अटक केली. पोलिसांनी तिघांची पोलिस कोठडी घेतली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times