नवी दिल्लीः ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराची दिल्ली पोलिसांनी माहिती दिली. हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १०६ जणांना अटक केली. तर १८ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. हिंसाचारग्रस्त भागावर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येत आहे, असं पोलिसांनी सांगितलं. हिंसाचाराच्या काळात घरांच्या छतांवरून पोलिसांवर दगडफेक केली गेली. ज्यांच्या छतांवरून दगडफेकीची पुरावे मिळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम.एस. रंधवा म्हणाले.

मदतीसाठी दिल्ली पोलिसांनी दिले फोन नंबर

ईशान्य दिल्लीतील स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. कुणीही भिती बाळगण्याचे कारण नाही. ज्यांना तक्रार करायची आहे त्यांनी 112 नंबरवर कॉल करावा. याशिवाय 22829334 आणि 22829335 या फोन नंबरवर फोन करून तक्रार करता येईल. तसंच कुठलीही माहिती नागरिकांना देता येईल, असं पोलिसांनी सांगितलं.

आतापर्यंत १८ गुन्हे दाखल

आफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन दिल्ली पोलिसांनी केलंय. पोलिसांनी आतापर्यंत १८ जणांविरोधात एफआयआर दाखल केलीय. तर १०६ जणांना अटक केलीय. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दंगलखोरांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात येणार आहे, असं पोलीस म्हणाले.

आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू

हिंसाचारग्रस्त भागात अतिरिक्त निम लष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसंच वरिष्ठ अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आज दिवसभरात कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही, असं पोलिसांनी सांगितलं. २४ जणांचा मृत्यू झालाय. तर २०० हून अधिक जण जखमी झालेत. या हिंसाचारात अनेक दुकानं आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आलीय. आज संध्याकाळी आणखी दोन जखमींचा मृत्यू झाला. यामुळे मृतांची संख्या वाढून २४ झालीय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here