गणेश वंदना असं या गाण्याचं नाव असून या गाण्यातून एक सामाजिक संदेशही देण्यात आला आहे. भक्तीचे दुसरे नाव सेवा, असा सकारात्मक संदेश गाण्यातून देण्यात आला आहे. अमृता फडणवीस यांनी कुटुंबातील प्रमुख स्त्रीची भूमिका साकारली आहे. अमृता फडणवीस यांच्या या गाण्याचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
संपूर्ण कुटुंब बाप्पाच्या आगमनाची तयारी करत असल्याचं या गाण्यात दाखवण्यात आलं आहे. बाप्पाच्या आगमनाची तयारी करत असताना एकीकडे घरातील स्त्रीला कामावर रुजू होण्यासाठी बोलावणं येतं. ही स्त्री डॉक्टर आहे. घरातील जबाबदाऱ्या पार पाडून ती रुग्णालयात रुग्णसेवेसाठी सज्ज होते. तिच्या कुटंबातील इतर लोकही तिला पाठिंबा देतात, असं या गाण्यात दाखवण्यात आलं आहे.
वाचाः
अमृता फडणवीस यांनी ट्वीटरवर या गाण्याची छोटीशी झलक ट्वीट केली आहे. नेटकऱ्यांनी लगेचच या गाण्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी अमृता फडणवीस यांचा आवाज सुरेख असल्याची दाद दिली आहे. तर, काहींनी गणपती बाप्पाला नमन केलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
वाचाः
पाहा व्हिडिओ
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times