म.टा. प्रतिनिधी, लोणावळा

मोठ्या बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्यात आलेल्या छोट्या बहिणीचा लोणावळ्यातील तुंगार्ली धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन ते अडीच या दरम्यान घडली आहे. (an 18 year old girl from mumbai drowned in the tungarli dam)

मनीष टक्कर (वय-१८) असे तुंगार्ली धरणात बुडून मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती मुंबईतील पवई येथील रामबाग मनुभाई चाळ येथील रहिवासी आहे.

लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ध्वनी तिच्या एका सख्ख्या बहिणीचा आज वाढदिवस होता. त्यामुळे तो साजरा करण्यासाठी ध्वनी व तिच्या तिच्या दोन बहिणी अशाप्रकारे तिघी सख्ख्या बहिणी व त्यांची एक मैत्रीण या चौघींजणी एका कारने लोणावळ्यात आले होत्या. दुपारी एकच्या दरम्यान त्या चौघीजणी लोणावळ्यातील तुंगार्ली धरणाकडे फिरायला गेल्या व त्या ठिकाणी बहिणीचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर त्या चौघीजणी धरणाच्या पाण्याच्या कडेला एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत मौज मस्ती करत होत्या.

यादरम्यान ध्वनी हिला येथील पाण्याच्या खोलीचा व परिस्थितीचा अंदाज न आल्याने ती पाण्यात बुडाली. ध्वनी बुडू लागल्याने तिच्या बहिणींनी आरडाओरडा सुरू केला. हा आरडाओरडा ऐकून त्याठिकाणी असलेल्या स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत ध्वनीला वाचवण्याचा प्रयत्न केला. दहा मिनीटांच्या प्रयत्नानंतर स्थानिकांना ध्वनीला बाहेर काढण्यात यश आले. बाहेर काढल्या नंतर तिला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तिचा मृतअसल्याचे घोषित केले.

या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक लक्ष्मण उंडे हे करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here