आज राज्यात झालेल्या ९२ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ८६ हजार ३४५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या किंचित घटली
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजार ४६६ वर आली आहे. काल ही संख्या ५० हजार ६०७ वर होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा वाढून तो १४ हजार ९७३ वर गेला आहे. ठाणे जिल्ह्यातही ही संख्या वाढून ती ७ हजार १०३ वर आली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ६ हजार ००७ इतकी खाली आली आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ४ हजार ९३७ वर घसरली आहे. तर, सांगलीत एकूण ३ हजार २४४ इतकी वाढली आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ६७६ वर खाली आली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईत उपचार घेत आहेत ३,८४५ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ती ३ हजार ८४५ इतकी वाढली आहे. तर, रत्नागिरीत १ हजार ०५४, सिंधुदुर्गात ९०२, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ७१७ इतकी आहे.
वाशिम जिल्ह्यात फक्त एक सक्रिय रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४३८, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ६४ वर खाली आली आहे. अमरावतीत ही संख्या ९४ वर खाली आली आहे. तर राज्यात सर्वात कमी रुग्णसंख्या वाशिम जिल्हयात आहे. येथे फक्त १ सक्रिय रुग्ण आहे.
क्लिक करा आणि वाचा-
२,९८,०९८ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४४ लाख ८७ हजार ९५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ७७ हजार ९८७ (११.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९८ हजार ०९८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ९५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times