नवी दिल्ली: मॅक्सिकोची महिला जीनत झकारियास जापाटाचा मॉन्ट्रियल स्पर्धेच्या दरम्यान मृत्यू झाला. या स्पर्धेतील एका सामन्यात तिला दुखापत झाली होती. त्यानंतर तिचा पाच दिवसांनी मृत्यू झाला. ती फक्त १८ वर्षांची होती.

वाचा-

बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या यवोन मिशेलने या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री आयजीए स्टेडियममध्ये मेरी पियर होले विरुद्ध झालेल्या लढतीत दुखापत झालेल्या जापाटाचा मृत्यू झाला.

वाचा-

या लढती दरम्यान जापाटाला अनेक वेळा कठोर ठोसे बसले. प्रतिस्पर्धी खेळाडूने मारलेला अपरकट कट पंत जापाटाच्या माउथगार्डच्या बाहेर गेला. चौथ्या फेरीत घंटा वाजल्यानंतर देखील जापाटा तिच्या कॉर्नरवर आली नाही. त्यानंतर तिला रिंगमध्येच झोपवण्यात आले. थोड्याच वेळा वैद्यकीय पथकाने तिला स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेपर्यंत नेले आणि तेथून रुग्णालयात पोहोचवले.

वाचा-

रुग्णालयात जापाटावर उपचार सुरू होते. पण अखेर तिचा मृत्यू झाला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here