किरीट सोमय्या हे सिधुदुर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हल्लाबोल करताना सोमय्या यांनी आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. अनिल परब यांच्या अनिधिकृत रिसॉर्टवर कारवाई ही होणारच, हिम्मत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ते वाचवून दाखवावे, असे आव्हानही सोमय्या यांनी दिले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधले असून त्यांची चौकशी देखील झालेली आहे. इतकेच नाही तर या बंगल्यांवर कारवाई करण्याचा निर्णय देखील झालेला आहे. या दोन रिसॉर्ट्सपैकी एका रिसोर्टचे नाव साई रिसोर्ट अॅनेक्स, तर दुसऱ्या रिसॉर्टचे नाव सी-कॉन्च रिसोर्ट असे आहे. हे रिसॉर्ट आपल्या मालकीचे असल्याची बाब परब हे लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
केंद्रीय पथकाने हे दोन्ही रिसोर्ट अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले होते. दोन्ही रिसोर्टच्या बांधकामातसीआरझेड कायद्याचे उल्लंघन झालेले आहे. पण सरकारने केवळ एकच साई रिसोर्ट तोडण्याचे आदेश दिले आहेत. दुसरे रिसोर्ट वाचवण्याचे पाप मात्र आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलेले आहे. पण आम्ही या रिसोर्टवर कारवाई करायला लावूच, दुसरे रिसॉर्ट पाडणारच, हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेंनी ते थांबवून दाखवावे, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
अनिल परब मंत्री आहेत म्हणून कारवाई होत नाही
लोकायुक्तासमोर या रिसॉर्टबाबत सुनावणी सुरू झाली आहे. सरकारने पण मालकांवर कारवाई होणार असे सांगितले आहे. पण कारवाई होत नाही. कारण अनिल परब मंत्री आहेत, असेही सोमय्या म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times