नवी दिल्ली: भारताचा कर्णधार सध्या त्याच्या खराब फॉममुळे चर्चेत असला तरी जगातील अव्वल फलंदाजांमध्ये त्याचा समावेश होते. क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजीत अव्वल असणारा विराट मैदानाबाहेर देखील किंग आहे. सोशल नेटवर्किंग वेबसाइट इस्टाग्रामवर विराटचे १५० मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. अशी कामगिरी करणारा विराट फक्त पहिला भारतीय नाही तर आशियाई व्यक्ती ठरला आहे. ३२ वर्षीय विराटचे शुक्रवारी इस्टाग्रामवर १५० मिलिनय फॉलोअर्स झाले आहेत.

वाचा-

फोटो ब्लॉगिंग या प्लॅटफॉर्मवर असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या यादीत विराट सध्या चौथ्या स्थानावर आहे. २६० मिलियन फॉलोअर्ससह फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो अव्वल स्थानी आहे. अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी २३७ मिलियनसह दुसऱ्या तर १५० मिलियनसह ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार तिसऱ्या स्थानावर आहे.

वाचा-

वाचा-

याआधी विराट कोहलीने इस्टाग्रावर ७५ मिलियन फॉलोअर्स असलेला तो पहिला आशियाई झाला होता. इस्टाग्रामशिवाय विराट ट्विटर, फेसबुक आणि अन्य सोशल मीडियावर आहे. तेथे देखील त्याला मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. ट्विटवर त्याचे ४३.४ मिलियन तर फेसबुकवर ४८ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

वाचा-

विराट कोहली इस्टाग्रामवरील पोस्टमधून तो पाच कोटी रुपये कमावतो. अव्वल स्थानी असलेला रोनाल्डो एका प्रायोजित पोस्टमधून ११.७२ कोटी रुपये कमावतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here