नागपूर: केंद्रीय मंत्री यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकांमधील आरोप तथ्यहीन आहेत असा दावा करतानाच त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या दोन्ही रद्द करण्यात याव्यात, असा युक्तिवाद गडकरींच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे करण्यात आला. ( )

वाचा:

याचिकाकर्ता आणि नफीस खान यांनी स्वतंत्र याचिका दाखल करीत गडकरींच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. गडकरींनी साठी दाखल केले शपथपत्र खोटे असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. यात त्यांनी दाखवलेली संपत्ती, मिळकतीबाबची माहिती खोटी असल्याचा दावा करण्यात आला आहे. नितीन गडकरी यांच्याकडून यावर आज बाजू मांडण्यात आली. वरिष्ठ अधिवक्ता यांनी गडकरींच्या वतीने बाजू मांडली. गडकरींवर करण्यात आलेले आरोप तथ्यहीन असल्याचा दावा त्यांनी केला आणि या याचिका रद्द करण्याची मागणी केली. यावर या प्रकरणी पुढील सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांनी आपली बाजू मांडावी असे आदेश न्यायालयाने दिले. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. सतीश उके यांनी बाजू मांडली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ सप्टेंबर रोजी होणार आहे.

वाचा:

नेमकं काय आहे प्रकरण?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि नफीस खान यांनी नितीन गडकरी यांच्या निवडीला याचिकेद्वारे हायकोर्टात आव्हान दिले आहे. नितीन गडकरी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे प्रतिज्ञापत्र भरताना त्यात आपल्या उत्पन्नाविषयी खोटी माहिती दिली. तसेच त्यांचे नाव नितीन जयराम गडकरी की नितीन जयराम बापू गडकरी असे आहे, हे सुद्धा स्पष्ट नाही. निवडणुकीत अनेक मतदान केंद्रांवर अतिरिक्त मतदान झाले असतानाही केंद्रप्रमुखांनी मतदान प्रक्रिया सुरूच ठेवली होती. मतदारांच्या नोंदणीतही मोठा घोळ होता. या सर्व बाबी विचारात घेता नितीन गडकरी यांनी चुकीच्या माहितीद्वारे मतदारांची फसवणूक केली असून त्यांची निवड अवैध ठरवण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here