जय (काल्पनिक नाव) हा १८ वर्षीय तरुण मीडिया स्टुडंट्स होता. त्याच्या मित्रांनी व्हॉट्सअॅपवर ‘Namunee’नी नावाचा ग्रुप तयार केला होता. त्याच्याशिवाय सात-आठ मित्रं या ग्रुपमध्ये होते. त्याचे मित्र त्याला चिडवायचे, त्याला ब्लॉक करायचे आणि त्रास द्यायचे त्यामुळे तो वैतागायचा. ग्रुपमधील अश्लील गोष्टींवर तो आक्षेप घ्यायचा. त्यामुळे त्याचे मित्र त्याला डिवचायचे. त्याच्या मित्रांनी त्याला व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्यानंतर त्याने ग्रुपमध्ये घेण्यासाठी वारंवार विनंती केली होती, असं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
त्याने कशा पद्धतीने आत्महत्या करावी, हे त्याच्या मित्रांनीच त्याला सांगितल्याचा आरोप जयच्या वडिलांनी केला आहे. त्याचे मित्र त्याला गरज पडेल तेव्हा ग्रुपमध्ये अॅड करायचे आणि नंतर पुन्हा काढून टाकायचे. त्यामुळे प्रचंड वैतागलेल्या जयने दोन आठवड्यांपासून कॉलेजला जायचेही बंद केले होते. अनेकवेळा त्याला विचारलं तरी त्याने काहीच सांगितलं नाही. शेवटी त्याने वैतागून शुक्रवारी आत्महत्या केल्याचं त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. या घटनेमुळे वसईत खळबळ उडाली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times