राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री यांचा आज (४ सप्टेंबर) वाढदिवस आहे. या निमित्ताने यशदा युवती फाउंडेशनच्या वतीने सुशीलकुमार किंवा सुशील नाव असलेल्या व्यक्तींना ५०१ रुपयांचे पेट्रोल मोफत दिले जात आहे. सात रस्ता येथील कारीगर पेट्रोल पंपावर सकाळी साडेनऊ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेविका व फाउंडेशनच्या संस्थापक फिरदोस पटेल यांनी दिली.
वाचा:
मोफत पेट्रोल मिळविण्यासाठी सुशीलकुमार किंवा सुशील हे नाव असणाऱ्या व्यक्तींनी आपले आधारकार्ड सोबत आणावयाचे आहे. त्यांनतर रीतसर नोंद करून त्याला तत्काळ ५०१ रुपयांचे पेट्रोल भरून देण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
वाचा:
देशात आज दिवसेंदिवस पेट्रोलचे दर कमालीचे वाढू लागले आहेत. सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. पेट्रोल महाग झाल्यामुळे अनेकांनी आता आपल्या सायकली बाहेर काढल्या आहेत. इंधनाचे दर वाढत चालले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र सामान्य माणसाचे काहीही देणेघेणे राहिलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचा निषेध आणि आपल्या नेत्याच्या नावाचा गौरव म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सांगितले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times