वाचा:
महापालिका निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सध्या जोरात सुरू केली आहे. पुणे महापालिका भाजपकडून घ्यायचीच, असा चंग राष्ट्रवादीनं बांधला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पुणे महापालिकेत लक्ष घातलं आहे. त्या पाठोपाठ आता शिवसेनेनं तलवार परजली आहे. राष्ट्रवादीतून आलेले माजी मंत्री सचिन अहिर व मनसेतून आलेले विद्यार्थी नेते आदित्य शिरोडकर यांना पुण्याची जबाबदारी देऊन शिवसेनेनं याची चुणूक दाखवली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज खासदार राऊत हे पुण्यात आले होते. खेड-शिरूरच्या कार्यकर्त्यांसमोर त्यांचं तुफानी भाषण झालं. राज्याच्या राजकारणात शिवसेनेचं महत्त्व किती आहे हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या भाषणातून केला.
वाचा:
‘राज्यात तीन पक्षाचं सरकार असलं तरी ज्याचा मुख्यमंत्री असतो, त्याचं सरकार असतं. हे ठाकरे सरकार आहे. दुसऱ्या कोणा मंत्र्याच्या नावानं सरकार ओळखलं जात नाही,’ असं राऊत म्हणाले. ‘अर्थात, महाविकास आघाडीतील सगळे पक्ष आणि नेते आपलेच आहेत. अजितदादा आपले आहेत. शरद पवार तर आपलेच आहेत. पवार साहेब देशाचे नेते आहेत. देशाचं नेतृत्व त्यांनीच केलं पाहिजे असं आम्ही स्वत: म्हणत असतो. अनेक जण सरकारमध्ये आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आहेत. पण शिवसेना सगळ्यांच्या वर आहे,’ असं राऊत म्हणाले. त्यांच्या या वाक्याला शिवसैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता राऊत यांच्या वक्तव्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते, याबद्दल उत्सुकता आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times