वृत्तसंस्था, पॅरिस

वयाच्या १७व्या वर्षी पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकाविणारी आणि वयाच्या १८व्या वर्षी जगातिक रँकिंगमध्ये अव्वल ठरलेली रशियन टेनिसपटू मारिया शारापोवाने बुधवारी आंतरराष्ट्रीय जाहीर केली. एका मासिकातील लेखात ३२ वर्षीय शारापोवाने ‘टेनिस… मी तुझा निरोप घेते आहे,’ असे म्हटले आहे.

‘२८ वर्षांनंतर आणि पाच ग्रँडस्लॅम किताब पटकाविल्यानंतर मी नव्या शिखरावर चढाई करण्यासाठी सज्ज झाले आहे. आणि हे पूर्णपणे वेगळे क्षेत्र आहे,’ असे या लेखात शारापोवाने म्हटले आहे. लहान वयातच आपल्या कौशल्याच्या जोरावर तिने यशोशिखर गाठायला सुरुवात केली. त्यात देखण्या रुपाने तिने साऱ्या जगाला तिचा खेळ बघण्यास भाग पाडले. २०१६मध्ये उत्तेजक द्रव्यसेवन चाचणीत दोषी आढळल्यानंतर १५ महिन्यांच्या बंदीनंतर तिने टेनिसमध्ये पुनरागमन केले खरे; मात्र खांद्याच्या दुखापतीवर ती मात करू शकली नाही. अखेर तिने टेनिसला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. बंदीनंतर पुनरागमन केल्यानंतर तिला पूर्वीसारखा खेळ काही करता येत नव्हता. त्यामुळे तिची जागतिक टेनिस क्रमवारीत महिला एकेरीत ३७३व्या स्थानावर घसरण झाली. यातच खांद्याच्या दुखापतीमुळे ती गेल्या वर्षी थोड्याच स्पर्धांमध्ये खेळताना दिसून आली. (तिला २००७पासूनच खांद्याच्या दुखापतीने सतावले.) गेल्या वर्षीच्या विम्बल्डन आणि अमेरिकन ओपनपाठोपाठ तिला या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही पहिल्याच फेरीतून बाहेर पडावे लागले. २००४मध्ये विम्बल्डन ओपन जिंकल्यानंतर ती २००५मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचली होती. जवळपास २१ आठवडे हा क्रमांक तिने राखला होता.

टेनिसने घडवले

शारापोवा म्हणाली, ‘माझ्या यशाचे एक रहस्य म्हणजे मी कधीच मागे वळून पाहिले नाही आणि खूप पुढचाही विचार केला नाही. टेनिससाठी मी माझे आयुष्य समर्पित केले आणि टेनिसनेही मला नवे आयुष्य दिले मला घडवले. रोजचा सराव, सकाळी उठून कोर्टवर जाणे, डाव्या पायातील बुटाची लेस आधी बांधणे, दिवसाचा पहिला चेंडू फटकविण्याआधीच कोर्टचे गेट बंद होणे या साऱ्या गोष्टींची आठवण होईल. माझा संघ, माझे प्रशिक्षक या सर्वांची आठवण येईलच. सराव करताना बेंच बसलेले माझे वडील, मी पराभूत झाले किंवा जिंकले, तरी माझ्याशी हस्तांदोलन ते करीत. आता जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा लक्षात येते की टेनिस हे एक महाकाय शिखरासारखे होते. माझा मार्ग हा खोल दऱ्या आणि खाचखडग्यांनी भरला होता. मात्र, शिखरावर पोहोचल्यानंतरचे दृश्य अविश्वसनीय होते.’

(३२ वर्षे)

६४५ विजय १७१ पराभव

३६ डब्लूटीए जेतेपदे ४ आयटीएफ जेतेपदे

४ ग्रँडस्लॅम (२००८ ऑस्ट्रेलियन, २०१२, २०१४ फ्रेंच, २००४ विम्बल्डन, २००६ अमेरिकन ओपन)

२०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये एकेरीत रौप्यपदक

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here