भंडारा : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रात धान पोते काढत असतांना थप्पी घसरून भरलेल्या पोत्यांखाली दबून ४ मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातिल दिघोरी/मोठी येथे घडली आहे. सखाराम सलामे वय ५० वर्ष, ताराचंद मसराम वय ३२ वर्ष, प्रभू अवचट वय ५५ वर्ष व गणेश मेश्राम वय ३२ वर्ष अशी जखमींची नावे आहेत.

दिघोरी/मोठी येथे शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्र असून येथे पावसाळी व उन्हाळी हंगामात धान खरेदी करून धानाची साठवणूक करण्यात आली होती. दरम्यान, गोदामामधून धान उचल करण्याचे काम सुरू असतांना यावेळी अचानक धान भरलेल्या पोत्यांच्या छल्लीतून काही पोते वरून घसरल्याने त्याखाली मजूर दबल्या गेले.

यावेळी गोदामात २१ मजूर कार्यरत होते. त्यापैकी ४ मजूर जखमी झाले. जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता नेण्यात आले असता प्रकृति गंभीर असल्याने भंडारा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here