राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून करोना रुग्णांची संख्या ४ ते ५ हजारांच्या दरम्यान स्थिर झाली आहे. राज्यात आज ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६२,८८,८५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०२ टक्के एवढं झालं आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,४६,६०,८२५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,८२,११७ (११.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,०२,१९६ व्यक्ती होम क्वारन्टाइनमध्ये आहेत तर २,०१३ व्यक्ती संस्थात्मक क्वारन्टाइनमध्ये आहेत.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये करोना संसर्गाची तीव्रता अधिक?
राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील करोना संसर्गाची स्थिती आटोक्यात असल्याचं चित्र आहे. राज्यातील केवळ ४ जिल्ह्यांमध्ये ५ हजाराहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात १५४६९, ठाणे जिल्ह्यात ७१७१, साताऱ्यात ६१७५ आणि अहमदनगरमध्ये ५०५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, राज्यातील करोनाबाधितांचे आकडे आधीच्या तुलनेत कमी दिसत असले तरीही तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्याने यंत्रणा सतर्कतेच्या भूमिकेत असून नागरिकांनीही खबरदारी घेण्याचं आवाहन शासन-प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times